नियम व अटी

जैन मंगलम वधू-वर सूचक केंद्र

फक्त जैन समाजासाठी

संचालक : श्री. गिरीश बाळासाहेब पाटील, BE, MBA

पुणे ऑफीस : ऑफीस नंबर-१०३, इंदिरा स्कूल समोर, सिद्धिविनायक अपार्टमेंट, पहिला मजला, भूमकर चौक, वाकड, पुणे - ४११०३३

कोल्हापूर ऑफीस : LG4, गायत्री अपार्टमेंट, विवेकानंद कॉलेज समोर, वारणा बँकेच्या खाली, ताराबाई पार्क, कोल्हापूर - ४१६००३

सांगली ऑफीस : पहिला मजला, गावभाग पोलीस चौकी नजीक, मारुती मंदिर रोड, रणझुंजार चौक / एस टी स्टॅन्ड जवळ, सांगली - ४१६४१६

संपर्क - 9730703855 / 7020460693

WhatsApp- 9730703855

ई-मेल - contact@jainmangalam.com | वेबसाईट - www.jainmangalam.com
कामकाजाची वेळ - सकाळी १० ते सायं ६ ( रविवार बंद)

आजची ऑफर - ५०% सवलत

नोंदणी फी रु. 2,000 /- (कालावधी- १ वर्षे) 4,000 Rs.

नोंदणी फी रु. 1,500 /- (कालावधी- ६ महिने) 3,000 Rs.

Membership Plans



केंद्राची प्रमुख वैशिष्ठ्ये

१) उच्चशिक्षित जैन समाजासाठी महाराष्ट्रातील अग्रणी विवाहसंस्था.
२) जैन मंगलम वधू वर संस्थेला लग्न ठरल्यानंतर कोणतीही फी अथवा देणगी दयावी लागत नाही याची नोंद घ्यावी.
३) आय टी / पदवीधर / इंजिनियर / डॉक्टर / उच्च पदवीधर / व्यावसायिक / शिक्षण / खाजगी व सरकारी क्षेत्रातील ६०००+ स्थळे, खानदानी, घरंदाज जैन स्थळे.
४) ऑनलाईन नोंदणी, एक्सप्रेस इंटरेस्ट, गतिमान संपर्क प्रणाली, वधू-वर मेळावे - विनामूल्य प्रवेश
५) नेमका ऑनलाईन सर्च - केंद्राच्या वेबसाईट वर SEARCH OPTION द्वारे वय, उंची, शिक्षण, नोकरी, मंगळ, व्यवसायाचे ठिकाण, खाजगी/सरकारी नोकरी, मूळ गाव या सर्वांवरून स्थळे शोधण्याची सुविधा अगदी मोफत घेऊ शकता.
६) केंद्राची तत्पर सेवा, पसंत असलेल्या स्थळांची माहिती (वर-वधूचे फोन नंबर्स, ई-मेल आय डी, घरचा पत्ता, आई-वडिलांचे नाव ) तत्काळ वेबसाईट वरचं आणि ई-मेलने मिळते.
७) आपण घेतलेल्या स्थळांना आपला इंटरेस्ट ई-मेल द्वारे पाठविला जातो. तसेच समोरील स्थळाकडून आपणास उत्तर मिळण्याची सोय.
८) ई-मेल / व्हॉट्स ऍप ग्रुप द्वारे स्थळे वेळोवेळी PDF लिंक च्या माध्यमातून पाठवली जातात.
९) वेबसाईट वर ४ फोटो ठेवण्याची व बदलण्याची मोफत सोय तसेच माहिती अपडेट करण्याची मोफत सोय.
१०) कार्यालयात येऊन वधू-वरांच्या फाइल्स / बायोडाटे पाहण्याची सोय.
११) वधू आणि वर दोन्ही पक्षांकरीता प्रामाणिकपणे आणि आत्मीयतेने काम.
१२) वधू-वरांचे ID/मोबाईल व्हेरिफाय करूनच सर्व पेड स्थळांची माहिती वेबसाईटवर टाकली जाते.
१३) महाराष्ट्रातील विश्वसनीय संस्था.
१४) वेबसाईट, लॉगिन, मेळावे, ई-मेळाव्या संदर्भात काही शंका किंवा इतर संबंधित प्रश्न असतील तर केंद्राच्या - 9730703855 या नंबर वर संपर्क करावा.

केंद्राचे नियम व अटी

१) फक्त जैन समाजातील शिक्षित, उच्चशिक्षित विवाह इच्छुक वधू-वरांची नाव नोंदणी होते.
२) जैन मंगलम वधू वर संस्थेला लग्न ठरल्यानंतर कोणतीही फी अथवा देणगी दयावी लागत नाही याची नोंद घ्यावी.
३) नेमका ऑनलाईन सर्च - केंद्राच्या वेबसाईट वर SEARCH OPTION द्वारे वय, उंची, शिक्षण, नोकरी, मंगळ, व्यवसायाचे ठिकाण, खाजगी/सरकारी नोकरी, मूळ गाव या सर्वांवरून स्थळे शोधण्याची सुविधा अगदी मोफत घेऊ शकता.
४) नावनोंदणी नंतर स्थळाचा फोटो आणि बायोडाटा वेबसाईट वर अपलोड केला जातो आणि त्यानंतर आपणास एक प्रोफाईल आयडी (Profile ID) मिळतो.
५) नावनोंदणी करणाऱ्या व्यक्तीने आपल्या स्थळाबद्दलची खरी खरी माहिती फॉर्म भरतेवेळी द्यावी. हे नावनोंदणी करणाऱ्या प्रत्येकाची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे. यात काही असत्य आढळल्यास त्याची सर्व कायदेशीर जबाबदारी नावनोंदणी करणाऱ्या व्यक्तीची असेल याची नोंद घ्यावी.
६) सभासदांनी पसंत केलेल्या स्थळांच्या माहितीची खातरजमा स्वतःच, आपले नातलग, मित्र मंडळी यांच्याद्वारे करून घ्यावी आणि नंतरच पूर्ण चौकशी आणि विचाराअंतीच लग्नासंदर्भात अंतिम निर्णय घ्यावा. भविष्यात काही प्रश्न उपस्थित झाल्यास त्यास संस्था अथवा संस्था चालक, संचालक, संयोजक जबाबदार राहणार नाहीत याची नोंद घ्यावी.
७) वेबसाईटवर चार फोटो ठेवण्याची/बदलण्याची तसेच माहिती अपडेट करण्याची मोफत सोय.
८) नावनोंदणी नंतर विवाह जमेलच किंवा अमुक दिवसात जमेल याची हमी आम्ही देत नाही. विवाह जुळणे हा एक योगायोग आहे.
९) विवाहयोग हा केंद्रातर्फे किंवा स्वतःच्या प्रयत्नाने जुळून आल्यास त्या संबंधीची माहिती कार्यालयास विनाविलंब ई-मेल आणि कॉल करून कळवावी. तसेच कार्यालयात स्वतः येऊन दिलेला फोटो आणि बायोडाटा परत घेऊन जायचा आहे. संस्थेच्या वतीने फक्त ऑनलाईन बायोडाटा वेबसाइटवरून काढला जाईल. अनावश्यक कॉल्स टाळण्यासाठी विवाहयोग जुळल्याची माहिती जबाबदारीने संस्थेला कळवणे बंधनकारक आहे. विवाह जमल्याची माहिती न कळवल्यास आपला बायोडाटा आपला प्लॅन संपल्यानंतरच संस्थेच्या वेबसाइटवरून आपोआप काढला जाईल.
१०) केंद्रातील माहितीचा कोणीही गैरवापर करू नये. तसे आढळल्यास संबंधितांचे सभासदत्व त्वरित रद्द केले जाईल.
११) केंद्रामार्फत ई-मेल, व्हाट्स अ‍ॅप ग्रुप, मेसेज व इतर माध्यमातून वेळोवेळी स्थळे सुचवली जाऊ शकतात.
१२) सर्व नोंदणीकृत सभासदांना वधू अथवा वर यांचे संपर्क क्रमांक प्रोफाइल च्या सगळ्यात शेवटी पाहता येतात. संपर्क क्रमांक पाहण्यासाठी आपल्याला आपला युजर ID आणि पासवर्ड वापरून लॉगिन करणे आवश्यक आहे.
१३) पत्रिका जुळत नाही तसेच देवक, गोत्र, नाडी व रक्तगट एक असल्यावर चांगले स्थळ नाकारणे ह्या गोष्टीना विज्ञानाची मान्यता नाही. कुंडलितील गुणापेक्षा मुलामुलींची प्रत्यक्षातील गुणांना महत्व आहे हे लक्षात घ्यावे.
१४) पालकांनी मुला/मुलींचा बायोडाटा पाहून त्यांची शैक्षणिक पात्रता, आर्थिक कुवत, शारीरिक अनुरूपता व अपेक्षा लक्षात घेऊन त्याप्रमाणे स्थळे घ्यावीत.
१५) वेबसाईट वर उपलब्ध असलेल्या सर्व स्थळांची माहिती मोफत आणि कधीही पाहू शकता.
१६) केंद्रातून /ऑनलाईन द्वारे एका सभासदाला आपल्या प्लॅननुसार दर ७ दिवसातून त्यांचे स्थळाला मॅच होणारे १० ते १८ बायोडेटे घेता येतात. म्हणजे प्रत्येक सभासद प्लॅननुसार दर ७ दिवसात १० ते १८ बायोडाटांचे संपर्क क्रमांक, वधू/वराचे नाव, पालकांचे नाव, ईमेल, घरचा पत्ता इत्यादी माहिती घेऊ शकतो.
१७) सभासदांनी आपल्या पसंतीच्या स्थळांना स्वतः संपर्क साधावा आणि पुढची बोलणी करावीत. संस्था आपल्याला बायोडाटा पुरवण्याचे काम करेल.
१८) आजच्या ऑफरनुसार नोंदणी फी रु. २,००० /- एकदाच भरावी लागते. (कालावधी - १ वर्षे). नोंदणी फी रु. १,५०० /- एकदाच भरावी लागते. (कालावधी - ६ महिने).
१९) नोंदणी फी रोखीने, चेक, ऑनलाईन पेमेंट, डी.डी, क्रेडिट, डेबिट कार्ड व इतर माध्यमातून भरता येईल. वेबसाईट वरील ONLINE PAYMENT GATEWAY चा पर्याय पाहावा.
२०) एकदा भरलेली नावनोंदणी फी कोणत्याही सबबीखाली परत मिळणार नाही.
२१) नाव नोंदणी करण्यापूर्वी वेबसाईटवर आपल्याला अनुरूप स्थळे आहेत किंवा नाहीत ते पाहावीत आणि त्यानंतरच नावनोंदणी करावी. नंतर तक्रार चालणार नाही.
२२) नाव नोंदणी केल्यानंतर आपला बायोडाटा केंद्राच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिला जातो. बायोडाटा मध्ये दिलेल्या माहितीची अचूकता प्रत्येकाने स्वतः तपासून घ्यायची आहे.
२३) आम्ही कोणत्याही सदस्यांना त्यांच्या गोपनीयतेच्या कारणांमुळे त्यांचा फोटो आणि बायोडाटा अपलोड करण्यास भाग पाडत नाही. वेबसाइटवर फोटो / बायोडाटा उपलब्ध नसल्यास याचा अर्थ आम्ही विनंती केल्यानंतरही त्यांनी त्यांचा फोटो, बायोडाटा संस्थेला दिलेला नाही. अशा वेळी सभासदांनी माहिती पसंत असलेल्या सभासदांना थेट संपर्क साधावा. तुमचा बायोडाटा योग्य वाटल्यास ते त्यांचा फोटो, बायोडाटा तुम्हाला जरूर शेअर करतील.
२४) तंत्रज्ञानाची जोड घेऊन अत्याधुनिक पद्धतीने कार्यरत असलेल्या आमच्या वधू-वर सूचक केंद्राचे सभासद होऊन आपण जैन समाजातील अधिकाधिक स्थळांपर्यंत पोहोचू शकता. वधू, वर, पालक वर्ग घरबसल्या आपल्याला अनुरूप योग्य बायोडाटा पाहू शकतात.
२५) आमच्या सर्व नियम, अटी, शर्ती विस्तृतपणे वाचण्यासाठी TERMS या लिंक वर क्लिक करा.
२६) वरील प्रमाणे नियम आणि अटी मान्य असल्यासच नांव नोंदणी करावी.


जैन मंगलम वधू वर - घरबसल्या स्थळांना संपर्क कसा कराल ?

खालील दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्ही तुमच्या इच्छित स्थळांना संपर्क करू शकता.
१) वधू-वरांचे संपर्क क्रमांक पाहण्यासाठी आपल्याला संस्थेची मेम्बरशिप/सभासदत्व घेणे अनिवार्य आहे. Membership Plans
२) सर्वप्रथम आपला इमेल किंवा मोबाईल नंबर आणि पासवर्ड वापरून लॉगीन करा (https://www.jainmangalam.com/login.php) किंवा LOGIN बटन वर क्लीक करा.
३) मेनू मधून आपल्याला जो प्रोफाइल आवडला आहे तो ओपन करा. *(Brides-मुली, Grooms-मुले)*
४) त्यांनतर प्रोफाईल च्या सगळ्यात शेवटी (View Contact Details) या बटन वर क्लीक करा.
५) त्यानंतर लगेचच सगळ्यात शेवटी संपर्क क्रमांक अनलॉक होतील आणि तुम्ही वर-वधूचे फोन नंबर्स, ई-मेल आय डी, घरचा पत्ता, आई-वडिलांचे नाव इत्यादी माहिती पाहू शकता.
६) तुम्हाला स्वतः तुमच्या इच्छित स्थळांना संपर्क करून पुढची बोलणी करायची आहेत.
७) काही प्रश्न असल्यास 7020460693 या नंबर वर Whats APP मेसेज करावा. कामकाजाची वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ६ (सोमवार बंद) .

जैन मंगलम वधू-वर सूचक केंद्र

संचालक : श्री. गिरीश बाळासाहेब पाटील, BE, MBA


Yog Vadhu Var Ruels
Yog Vadhu Var Ruels


🛑 महत्वाचे - फसवणूकी पासून सावधान- 🛑

WWW.jainmangalam.com या वेबसाईटवर नोंदणी केलेल्या सर्व सभासदांना नम्र सूचना व आवाहन -

जैन मंगलम वधू-वर सूचक केंद्र संस्थेने कोणत्याही व्यक्तीस, संस्थेस वेगळी रक्कम व माहिती घेण्यासाठी नेमणूक केलेली नाही. तसेच लग्न ठरल्यानंतर संस्था कोणतीही अतिरिक्त फी अथवा अथवा देणगी घेत नाही. इतर कोणत्याही वधूवर संस्था, व्यक्ती, एजेंट किंवा इतर कोणीही आपली माहिती घेऊन रक्कम घेतल्यास जैन मंगलम वधू-वर सूचक केंद्र जबाबदार नाही. जैन मंगलम चे नाव घेऊन एखादी व्यक्ती, संस्था पैसे मागत असल्यास त्याची माहिती त्वरित संस्थेस देऊन सहकार्य करावे ही विनंती. फक्त जैन मंगलम वधू-वर सूचक च्या अधिकृत शाखा किंवा मुख्यालयाशी संपर्क करावा.

आमच्या अधिकृत शाखा सध्या - कोल्हापूर, पुणे, सांगली या ठिकाणी आहेत.

आमचे सर्व मार्केटिंग किंवा इतर अधिकृत मेसेजेस फक्त खालील नंबर्स वरूनच पाठवले जातात.

7020460693
9730703855

कामकाजाची वेळ - सकाळी १० ते सायं ६ (कोल्हापूर ऑफीस - सोमवार बंद) | (सांगली ऑफीस - रविवार बंद)